*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी अरुण वि देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।
___________________________
श्री स्वामी समर्थ काव्य वंदना काव्यपुष्प – ४८ वे
श्री स्वामी समर्थ भ्रमणगाथा ..
__________________________
सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा गाव नामी
ख्याती याची “संत वास्तव्याची पुण्यभूमी ।।
कान्होपात्रा, आणिक दामाजी पंत
चोखामेळा ऐसें इथले थोर संत ।।
अनेक नावे धारण स्वामींनी केली
देशात स्वामींनी अखंड भ्रमंती केली ।।
एक नाव त्यांचे श्री संचारेश्वर स्वामी
दुजे नाव धारण केले जगन्नाथ स्वामी ।।
चंचल भारती नावाने ते करिती भ्रमंती
अंती स्वामी समर्थ मंगळवेढ्यास येती ।।
इसवी सन १८३८ चे ते साल होते
स्वामी पहिल्यांदा इथे आले होते ।।
निवडुंग काटेरी,उंच गवत कुसळी
राहती स्वामी,होती तिथे विपुल बाभळी ।।
स्वामीविषयी इथे कुणा माहिती नव्हती
कोण ,कुठले ते, काहीच कल्पना नव्हती ।।
निर्लेप,निर्विकार, निस्पृह मूर्ती ती
ओळख हीच स्वामींची अवतीभवती ।।
*********
करी क्रमशः हे लेखन कवी अरुणदास
__________________________
कवी अरुणदास ” अरुण वि.देशपांडे- पुणे.
___________________________
