दोडामार्ग :
व्हाईस ऑफ मीडिया व इतर डिजिटल मीडिया पत्रकार हे व्यावसायिक पत्रकार असून, स्थानिक व राष्ट्रीय माध्यमांत वार्तांकनाचे कार्य करत आहे. दिनांक १० नोव्हेंबर रोजी सामाजिक माध्यमावर संदेश वरक मिञ मंडळ या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये पञकाराविरुद्ध एका इसमाने बदनामीकारक मजकुर प्रसारित केला आहे. तसेच त्या मजकुर दरम्यान पञकारांच्या खोटी, अपमानास्पद व प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारी पोस्ट / विधाने प्रसिद्ध केली आहेत. त्या मजकुरामुळे समाजामध्ये गैरसमज निर्माण झालेआहे. ही कृती भारतीय दंड संहिता कलम 499, 500 तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम, 2000 अंतर्गत गुन्हा ठरतो. त्यामुळे त्या इसमावर कारवाई करावी अशी मागणी व्हाईस ऑफ मीडिया व इतर डिजिटल मीडिया पत्रकारांनी दोडामार्ग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
यावेळी व्हाईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष भूषण सावंत, कार्यकारिणी सदस्य प्रथमेश गवस, दोडामार्ग तालुकाध्यक्ष बुधाजी उर्फ आपा राणे, सचिव प्रतिक राणे, पञकार प्रमोद गवस, गोविंद शिरसाट उपस्थित होते. यावेळी उपनिरीक्षक नरेंद्र पाटील यांनी सदर इसमावर कारवाई करण्यात येईल असे शब्द दिला.
