You are currently viewing सावंतवाडी नगरपरिषद निवडणूक २०२५ : बिगूल वाजला, पण राजकीय रणभूमी रिकामीच!

सावंतवाडी नगरपरिषद निवडणूक २०२५ : बिगूल वाजला, पण राजकीय रणभूमी रिकामीच!

  • Post category:इतर
  • Post comments:0 Comments

१० नोव्हेंबरला अर्ज प्रक्रिया सुरू, तरी एकही अर्ज दाखल नाही; शुभमुहूर्त आणि पक्षीय चर्चेत उमेदवार व्यस्त

 

सावंतवाडी :

सावंतवाडी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीचा बिगूल १० नोव्हेंबर २०२५ रोजी वाजला असून त्यानुसार नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली. मात्र, पहिल्याच दिवशी नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, उमेदवारांकडून कागदपत्रांची पूर्तता आणि पक्षीय चर्चेची लगबग सुरू असून अर्ज दाखल करण्यासाठी शुभ मुहूर्ताची प्रतीक्षा करण्यात येत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर २०२५ असून सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत अर्ज दाखल करता येतील. अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २१ नोव्हेंबर आहे.

यानंतर २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार असून ३ डिसेंबर २०२५ रोजी मतमोजणी पार पडेल. पहिल्याच दिवशी अर्ज न आल्याने निवडणूक कार्यालयात शांतता तर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा