*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा काव्य निनाद साहित्य मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा पिटके लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आयुष्य खूप सुंदर आहे*
आयुष्य खूप सुंदर आहे,
जगायचे आनंदात
सोबतीला नसेल कुणी
दुःख नसावे मनात
असेल सुगंध मृगाला
करावा विचार कशाला?
सागराची अथांगता
आणि गंध त्या फुलाला
आलो जगात एकटे
एकट्यानेच जायचे
व्यर्थ विचार करून
नाही कधी झुरायचे
कृपा आहे ईश्वराची
वरदान हे वाचेचे
किती सुंदर जीवन
आभार कृपाळू देवाचे
अंगणात पारिजात
सांगे आम्हा खुणावून
मनुष्य जन्म दुर्लभ
घ्यावे मस्तीत जगून
प्रतिभा पिटके
अमरावती
९४२१८२८४१३
