कलंबिस्तमध्ये शिवसेनेत इनकमिंगचा धडाका;
तब्बल अडीचशे ग्रामस्थांचा पक्षप्रवेश
सावंतवाडी (प्रतिनिधी) :
तालुक्यातील कलंबिस्त गावात रविवारी रात्री शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर इनकमिंगचा धडाका पाहायला मिळाला. गावातील तब्बल अडीचशे ग्रामस्थांनी माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
या प्रसंगी विधानसभा प्रमुख प्रेमानंद देसाई, तालुका प्रमुख दिनेश गावडे, अजय गोंदावळे, परीक्षित मांजरेकर, विनोद सावंत, अर्चित पोकळे यांसह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रघुनाथ सावंत यांनी केले.
या सामूहिक प्रवेशामुळे कलंबिस्त गावात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम झाली असून, आगामी राजकीय समीकरणांवर या प्रवेशाचा प्रभाव दिसून येईल, अशी चर्चा स्थानिक पातळीवर रंगली आहे.
