*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*माझी.. लेखणी…!! शब्द माझे*
माझी सिध्दहस्त लेखणी
तिला धार नाही
कुणाला जखम होईल
इतकी प्रतिभा नाही ..!
ना …मला कुणी आदर्श
ना …कुणी मला गुरू सारे मायमराठीचे लेकरं
हेच माझे.. सदगुरू …!
आयुष्य माझं एकट्याचं नाही
हे जाणूनच माझी लेखणी लिहीते
अहंकार… पूर्ण गुंडाळून
ती माणसा माणसात डोकावते..!
कोषातून बाहेर निघत
मी आरसा बघून घेतो
जिवलग माणसं.. जोडत
नजरेला नजर भिडवतो ..!
दुस-याचं राज्य स्वतःवर
लेखणी जाणून बुजून घेते
दुःख,अन्याय,अत्याचार,
सत्याला वाचा फोडते …!!
प्रतिभा असेल नसेल जरी
जागर तिचा करावा लागतो..नुसतं
लेखणीला ओवाळण्यातं अर्थ नाही
कधीतरी गाभा-यात उभं राहावं लागत
बाबा ठाकूर
