You are currently viewing प्रवाह

प्रवाह

*ज्येष्ठ लेखक कवी भूमिपुत्र वाघ लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*प्रवाह*

 

उघड्यांचे अंग झाकाया

धागा धागा विणतो आहे

देणे माझ्या मातृभूचे

एक रोप लावतो आहे…

 

अन्न निर्मिन्यासाठी

कुणब्यांच्या पाठी आहे

लाखोंची भूक भागवाया

ती भाकरी निर्मितो आहे

 

जो मजशी मिळाला धम्म

तो धर्म पेरतो आहे

उद्याच्या सारस्वतांसाठी

आज शांती शोधतो आहे

 

तुटनाऱ्या सर्व ताऱ्यांना

ओटीत झेलतो आहे

आई हिराऊ नये कोणाचीच

देवा विरोधात लढतो आहे.

 

दुःख कोणास येऊ नये

सुखाचे गाणे गातो आहे

रोज व्हावा पावसाळा

म्हणून दुष्काळ जाळतो आहे.

 

व्हावे भले इथल्यांचे

तपश्चर्येचा घाट घालतो आहे

विषमतेचे तोंडतो साखळदंड

क्रांती बदलाची करतो आहे.

 

विद्रोही

भूमिपुत्र वाघ.

प्रतिक्रिया व्यक्त करा