*ज्येष्ठ कवी दुर्गाप्रसाद खांडाळेकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*अशी होते कविता*
जेव्हा मी कविता करतो
शब्दांच्याच जगात मी असतो
मी शब्दांशी खेळतो
शब्द माझ्याशी खेळतात
कल्पनाही असते आमच्या साथीला
त्या शिवाय नाही येणार कविता
जन्माला
असा आम्हा तिघांचा होतो खेळ
श्री कृपेने त्यांचा घातला जातो मेळ
त्यातूनच कविता जन्म घेते
रसिकांना आनंद देते
दुर्गाप्रसाद खांडाळेकर.
