You are currently viewing देवसूतील शेंडोबा माऊलीचा १२ रोजी जत्रोत्सव.

देवसूतील शेंडोबा माऊलीचा १२ रोजी जत्रोत्सव.

*देवसूतील शेंडोबा माऊलीचा १२ रोजी जत्रोत्सव.*

सावंतवाडी

देवसूचे ग्रामदैवत श्री देवी शेंडोबा माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव बुधवार, १२ नोव्हेंबर रोजी होणार आहे. शेंडोबा माऊली हे देवसूसह केसरी आणि दाणोली या तीन गावांचे एकत्रित देवस्थान आहे. यानिमित्त मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर शेंडोबा माऊलीला फुलांनी सजविण्यात येणार आहे. तीन गावच्या भरजरी वस्त्र व सुवर्ण अलंकारांसह आकर्षक मानकऱ्यांच्या उपस्थितीत देवीची मानाची ओटी भरल्यानंतर दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी होणार आहे.
यानिमित्त रात्री सवाद्य पालखी मिरवणुकीनंतर उशिरा आरोलकर दशावतार कंपनीचे नाटक होणार आहे. भाविकांनी देवीचे दर्शन घ्यावे, असे आवाहन या तिन्ही गावच्या मानकरी आणि देवसू ग्रामस्थांनी केले आहे.
१५ रोजी हरिनाम सप्ताह मंदिरात शनिवार, १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वा. हरीनाम सप्ताहाला विधीवत प्रारंभ होणार आहे. मध्यरात्री कुळघराकडून सवाद्य वारकरी दिंडी निघणार आहे. यादिवशी देवसू परिसरातील भजनी मंडळे आपली सेवा शेंडोबा माऊली चरणी अर्पण करून अखंड जागर करणार आहेत. दुसऱ्या दिवशी, रविवारी दुपारी महाप्रसादाच्या कार्यक्रमाने या हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा