*साहित्यिकांनी सहभागी होण्याचे आव्हान भूमिपुत्र वाघ यांनी केले आहे…*
पवित्र अचलबेट देवस्थान तुरोरी तालुका उमरगा जिल्हा धाराशिव या ठिकाणी, काव्यप्रेमी महाराष्ट्र आयोजित राष्ट्रीय पातळीवरचे पहिले अभंगवाणी साहित्य संमेलन होणार असल्याची माहिती संयोजक, आयोजक भूमिपुत्र वाघ यांनी दिली.
पुरोगामी महाराष्ट्रामध्ये साहित्याच्या संदर्भात विविध प्रकारची साहित्य संमेलने नियमित कोठे ना कोठे होत असताना, अभंगवाणी साहित्य संमेलन हे आगळं वेगळं आणि निश्चितच पुरोगामी विचाराला पुरस्कृत करणारे हे पहिले साहित्य संमेलन ठरणार आहे. या साहित्य संमेलनाकडे महाराष्ट्रातल्या विविध साहित्यिकांचे विशेष लक्ष लागलेले असून ते एक आकर्षण ठरणार आहे. हे साहित्य संमेलन 23 नोव्हेंबर 2025 रोजी रविवारी सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंत होईल. महाराष्ट्रातील तमाम सहभागी कवींना ट्रॉफी देऊन सन्मानित केले जाणार आहे.अभंग वाणी साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून भूमिपुत्र वाघ यांचे धर्मगुरू विश्वनाथ (अण्णा) तोडकर अध्यक्ष महाराष्ट्र लोक विकास मंच, ह भ प श्रीहरी लवटे गुरुजी, अनाथ गरिबांची माय विद्याताई वाघ उद्घाटक म्हणून विशेष उपस्थित राहणार आहेत.
संमेलनाच्या दिवशी सकाळी चहा नाष्टा दुपारी महाप्रसाद,सभा मंडप स्पीकर याची सोय अचलबेट देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे. अशी माहिती संयोजक, आयोजक भूमिपुत्र वाघ,लक्ष्मण पवार उमरगा, प्रल्हाद पांचाळ परभणी, सुनंदा भगत नांदेड, रमाकांत कुलकर्णी पुणे. यांनी दिली तर महाराष्ट्रातील विशेष अभंगकार, संत साहित्यिक यांनी सहभागी व्हावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
सर्व अभंगकार हे स्वतःच्या रचना सादर करणार आहेत.
नोंदणीसाठी भूमिपुत्र वाघ यांना संपर्क करावा अशी माहिती संयोजक मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. नोंदणी मर्यादित असून दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळ पर्यंत चालेल. त्यानंतर नोंदणी बंद होईल. नोंदणीसाठी संपर्क. भूमिपुत्र वाघ 9172972482 असा आहे.

