*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तथा जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी वि ग सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*शांत निर्झर*
〰️〰️〰️〰️
झुळझुळणारा हा शांत निर्झर
गुणगुणतो गीत तुझेच निरंतर
एकांतही हा आसक्त तुझ्यावर
तुझेच आठव या हृदयी चिरंतर
सत्यस्वप्नातील तू अभिसारिका
अंतरी पाझरते जणु श्रावणसर
भावशब्दांच्या पावन गंगालहरी
जीवास चिंब भिजविती तीरावर
अव्यक्तलेले हितगुज जरी अंतरी
गाज तुझी नित्य ऐकू मनाभीतरी
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*©️ वि. ग . सातपुते ( भावकवी )*
“📞 *( 9766544908)*
