*खासदार नारायण राणे हे माझे राजकीय गुरु*
*पालकमंत्री नितेश राणे यांच्या विधानावर संजू परब यांचा पत्रकारांशी संवाद*
*स्वायत्त संस्थांच्या निवडणुकीत दीपक केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शिंदे गटाचेच वर्चस्व राहणार*
सावंतवाडी
खासदार नारायण राणे हे माझे राजकीय गुरु आहेत, रवींद्र चव्हाण आणि सावंतवाडीकर जनता, श्री देव पाटेकर देवता, आणि मी अनेक वर्ष सावंतवाडी शहराचा रहिवासी असल्यानेच नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसलो. त्यामुळे मी नगराध्यक्ष केलं, असे कोण म्हणत असेल तर तसे नाही. पालकमंत्री नितेश राणे यांच्या विधानावर सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सच्चिदानंद उर्फ संजू परब यांनी पत्रकारांच्या आग्रहास्तव उत्तर दिले.
पालकमंत्री नितेश राणे यांनी भाजपाचे युवा नेते विशाल परब यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी संवाद साधताना संजू परब यांचा नामोल्लेख टाळत नगराध्यक्ष मी केलं असे विधान केले होते.
या विधानावर संवाद साधण्यासाठी पत्रकार संजू परब यांच्या संपर्कात होते.
माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या संपर्क कार्यालयात संजू परब यांच्याशी संवाद साधण्याची संधी पत्रकारांना मिळाली. दीपक केसरकर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठक आटोपल्यानंतर ते बाहेर पडले. त्यानंतर संजू परब यांनी पत्रकारांशी संवाद साधला
आत्ताच गुन्ह्यातून निर्दोष सुटलो, आमची पीएचडी झाली आहे, नितेश राणे यांच्या विधानावर प्रश्नोत्तरादाखल संजू परब यांनी उत्तर देण्याचे टाळले.
महायुतीच्या माध्यमातूनच आमचे आमदार निवडून आले. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात पक्षाची ताकद आहेतच आणि केसरकर यांची पण ताकद आहे, येत्या स्वायत्त संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे वर्चस्व राहील असा विश्वास संजू परब यांनी व्यक्त केला
