मालवण नगरपरिषद निवडणुकीसाठी शिवसेनेकडून इच्छुक उमेदवारांचे मागणी अर्ज उद्या
मालवण
मालवण नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक 2 डिसेंबर रोजी होणार असून, नगराध्यक्ष पदासह एकूण 20 नगरसेवक पदांसाठी ही निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांचे मागणी अर्ज शुक्रवार, 7 जानेवारी रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत मालवण येथील पक्ष कार्यालयात भरणा करून घेतले जाणार आहेत.
या कार्यक्रमास शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व मालवण शहरप्रमुख दिपक पाटकर प्रमुख उपस्थित राहणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी वेळेत उपस्थित राहून आपल्या उमेदवारीसंबंधी मागणी अर्ज भरावेत, असे आवाहन शिवसेना पक्ष संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
