You are currently viewing भाजपा महीला मोर्चा आयोजित मोफत प्रशिक्षण शिबिरात महीलांचा उस्फूर्त प्रतिसाद.

भाजपा महीला मोर्चा आयोजित मोफत प्रशिक्षण शिबिरात महीलांचा उस्फूर्त प्रतिसाद.

*भाजपा महीला मोर्चा आयोजित मोफत प्रशिक्षण शिबिरात महीलांचा उस्फूर्त प्रतिसाद.*

वेंगुर्ला

भाजपा महिला मोर्चा, वेंगुर्ला यांच्या वतीने आयोजित आणि भाजपा युवा नेते विशालभाई परब पुरस्कृत महिलांसाठी मोफत प्रशिक्षण शिबिराचा समारोप साई मंगल कार्यालय, वेंगुर्ला येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
तीन दिवस चाललेल्या या प्रशिक्षण शिबिरात वेंगुर्ले शहरातील तसेच तालुक्यातील विविध गावांमधील शेकडो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. शिबिरात सहभागी महिलांना मोत्यांचे दागिने, फॅब्रिक ज्वेलरी, मोत्यांचे महिरप, मॅट रंगोळी प्रशिक्षण आणि कचऱ्यापासून फॅन्सी वस्तू तयार करणे या विषयांवर उमा फॅशन इन्स्टिट्यूट , चिपळूण च्या संचालिका व प्रशिक्षक सौ. उमा म्हाडदळकर यांचेकडून सविस्तर प्रत्यक्ष मार्गदर्शन देण्यात आले.
समारोप कार्यक्रमात महिलांनी प्रशिक्षणादरम्यान तयार केलेल्या वस्तूंचे आकर्षक प्रदर्शन मांडले. उपस्थित पाहुण्यांनी या कलाकृतींचे कौतुक करत महिलांच्या कल्पकतेचे आणि मेहनतीचे विशेष अभिनंदन केले.
आयोजकांनी सांगितले की, “या तीन दिवसांच्या शिबिराला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हे महिलांच्या आत्मविकासाची आणि स्वावलंबनाची जाणीव वाढल्याचे चिन्ह आहे. प्रत्येक सहभागी महिला आता स्वतः काहीतरी करण्याच्या आत्मविश्वासाने परिपूर्ण झाली आहे. भविष्यात अशा आणखी उपक्रमांचे आयोजन करून अधिकाधिक महिलांना कौशल्यविकास आणि रोजगार निर्मितीच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा आमचा संकल्प आहे .”
यावेळी जिल्हा उपाध्यक्षा ॲड सुषमा प्रभूखानोलकर , जि.उपाध्यक्षा सौ. वृंदा गवंडळकर, शहर अध्यक्ष सौ. श्रेया मयेकर, ता. चिटणीस सौ. चेतना राजपूत , मा.नगराध्यक्षा डॉ. पुजा कर्पे , अणसुर उपसरपंच वैभवी मालवणकर , सौ.आकांक्षा परब , मा. नगरसेविका सौ. कृपा मोंडकर , सौ. साक्षी पेडणेकर , सौ. प्रार्थना हळदणकर , सौ. रसिका मठकर, हसीनाबेन मकानदार , सौ. ज्योती देसाई उपस्थित होत्या .
शिबिराच्या यशस्वी आयोजनात स्थानिक महिला कार्यकर्त्यांचे मोलाचे योगदान लाभले. प्रशिक्षकांनी प्रशिक्षण काळात प्रत्येक महिलेला वैयक्तिक मार्गदर्शन करून प्रत्यक्ष कौशल्य विकसित केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहभागी महिलांना प्रशिक्षण पूर्णत्वाचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. महिलांनीही या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त करत भविष्यात स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला.
वेंगुर्ल्यातील हे प्रशिक्षण शिबिर महिला सक्षमीकरण, स्वावलंबन आणि कौशल्यविकासाच्या दिशेने टाकलेले एक प्रेरणादायी पाऊल ठरले असून, या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा