✒️प्रतिभा पिटके, अमरावती
श्री राजेश नाईक व श्री दीपक पटेकर संपादित संवाद मिडियाचा दिवाळी अंक हातात पडला आणि मन आनंदाने भरून आले. कु.अपर्णा जाधव हिने रेखाटलेल्या मुखपृष्ठापासून अगदी शेवटच्या पानापर्यंत सर्वांगसुंदर असा हा दिवाळी अंक! स्पर्श मुलायम मोरपीसच जणू!
संवाद दिवाळी अंक प्रकाशनाचे हे सलग पाचवे वर्ष आहे. अतिशय माफक किंमत असलेला हा दिवाळी अंक म्हणजे रसिकांना साहित्यिक मेजवानीच! पूर्णपणे साहित्यिकांच्या कलागुणांचा मुक्तविहार असलेला हा अंक लेख, लालित्याची नक्षत्रे, वैशिष्ट्यपूर्ण, कथासार, खाद्यसंस्कृती, व काव्यरंग अशा विविध दालनांनी सजलेला आहे. ११४ पानांचा असलेला हा दिवाळी अंक आकर्षक आहेच, परंतु ह्या अंकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या अंकात ज्यांचे साहित्य समाविष्ट आहे त्यांच्याकडून कोणतेही शुल्क न घेता प्रत्येक साहित्यिकाला हा अंक विनामूल्य, दिवाळी भेट म्हणून घरपोच दिला जातो, ह्याचे मला खूप आश्चर्य वाटते. अंक छपाईसाठी खर्च तर येतच असणार ना! मला वाटतं, नव्हे खात्रीच आहे की अशा प्रकारचा विनामूल्य असणारा हा एकमेव दिवाळी अंक आहे! अर्थात ह्याचे सारे श्रेय संपादक मंडळी आणि ब्युरो चीफ विभावरी परब यांना आहे. कोरोना काळात सुरू झालेले संवाद मीडिया चॅनेल सगळ्यांना आवडणारे आहे, ह्याचे कारण असे की, प्रत्येकाला येथे आपुलकी, स्नेह मिळतो, नम्रतेची वागणूक मिळते, आपण पाठविलेल्या साहित्याची ताबडतोब नोंद घेतली जाते,
आणि लिहित्या हातांचा सन्मान म्हणून दिवाळी अंक विनामूल्य प्रत्येक लेखकापर्यंत पोहचविण्याची तत्परता!
संवाद दिवाळी अंक विविधतेने नटलेलाअसून सर्वांगसुंदर झाला आहे, त्याला संपादक मंडळींच्या मायेचा स्पर्श आहे, ह्याची जाणीव अंक हातात घेताच होते हे निर्विवाद सत्य!
संवाद मीडियाची उत्तरोत्तर प्रगती होत राहील ह्यात शंका नाही. पाच वर्षांपूर्वी लावलेला हा साहित्यवेल असाच झपाट्याने बहरत रहावा ही शुभेच्छा..!
प्रतिभा पिटके
अमरावती
9421828413
