*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी अरुण वि देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
।।गण गण गणात बोते। जय गजानन श्री गजानन ।।
__________________________
श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प – १२३ वे
अध्याय – २० वा , कविता – ३ री
__________________________
माधव मार्तंड जोशी सरकारी कामाला।आले कळंब कसूर गावाला । काम झाले, वाटले त्याला । जावे दर्शनास शेगावाला ।।१ ।।
त्याने सूचना केली शिपायाला । दमणी तयार करण्याला।
म्हणाले, जायचे आहे आपल्याला। दर्शनास शेगावाला ।।२।।
जोशी दमणीत बसला । नदीपात्रात उतरला । अचानक
मुसळधार पाऊस सुरू झाला । नदीला मोठा पूरही आला ।।३।
झंझावात सुरू झाला । शिपाई जोशी साहेबास बोलला ।
उपाय नाही आता उरला । यातून सुटकेचा ।।४ ।।
जोशी घाबरले मनोमनी । केली स्वामींची विनवणी ।
स्वामी, वाचवा या संकाटातूनी । तुम्हीच आमुचे त्राता ।।५।।
शिपायास जोशी बोले । स्वामींचे भजन पाहिजे केले ।
स्वामीं रक्षणकर्ते आपुले । संकट समयासी ।६ ।।
तसेच झाले । भक्तच्या रक्षणा स्वामी धावले ।
जोशी सुखरूप पैलतीरी आले । शेगावी आले स्वामीकृपेने ।।७ ।।
समाधी दर्शन झाले । जोशी संतोषले । बाळाभाऊजवळ
पैसे दिले । म्हणाले, ब्राम्हण-भोजन घालावे ।।८ ।।
********
करी क्रमशः हे लेखन कवी अरुणदास
___________________________
कवी अरुणदास ” अरुण वि.देशपांडे- पुणे.
___________________________
