*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*संकोच कसला ..गं..!!*
संकोच कशाला करते गं !
प्रेम भरभरून व्यक्त कर
संकोच कसला करते गं !
प्रेम नजरेने शब्दांतून कर
अगं प्रेम असतं तरी काय
आळवाच्या पानावरच पाणी
हिंदकळणारच गं ते !म्हणून का!
प्रेमच सोडून द्यायच कां गं राणी
संकोच मुळीच करू नकोस दौलत जेवढी प्रेमाची उधळशील
अगं तुझाच !मौल्यवान ठेवा तो !
दुपट्टीने पदरी परत तुझ्याकडे येईल
तुझ्या प्रेमाच्या रूपेरी प्रकाशांत
आळवावरचं पाणी लागलं चमकायला
अन् चांदणांच्या शितल उजेडात
तुझं प्रतिबिंब लागलं उमटायला
तुझ्या प्रेमाचा निर्मळ वर्षाव
भोवताली शिंपडला जातो
दवबिंदूनाही तो झेलता येईल
यांत संकोच कसला गं येतो !!!
बाबा ठाकूर
