You are currently viewing शासन आपल्या दारी मोहिम

शासन आपल्या दारी मोहिम

शासन आपल्या दारी मोहिम

शिल्लक निवाडा रक्कम मोबदला वाटपासाठी विशेष शिबिराचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी

‘शासन आपल्या दारी या महत्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत भूसंपादन निवाड्यातील शिल्लक निवाडा रक्कम मोबदलाधारक यांना वाटप करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय कुणकवण  ता. देवगड, ग्रामपंचायत कार्यालय इन्सूली ता. सावंतवाडी व ग्रामपंचायत कार्यालय दारुम, ता. कणकवली येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कॅम्पमध्ये मोबदला मिळणेचा शिल्लक खातेदार यांनी आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहावे. तलाठी यांच्याकडे दिलेल्या परिशिष्टमधील कागदपत्रे येतना घेवून यावीत. तलाठी तथा ग्राम महसूल अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन  उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) शारदा पोवार यांनी केले आहे.

            सदर कॅम्प ग्रामपंचायत कार्यालय कुणकवण, ता. देवगड येथे दि. 6 नोव्हेबर, 19 नोव्हेबर, 26 नोव्हेबर,         3 डिसेंबर, 10 डिसेंबर, 17 डिसेंबर, 24 डिसेंबर व 30 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. ग्रामपंचायत कार्यालय इन्सूली ता. सावंतवाडी येथे दि. 10 नोव्हेंबर रोजी तर ग्रामपंचायत कार्यालय दारुम, ता. कणकवली येथे      दि. 12 नोव्हेबर 2025 रोजी आयोजित करण्यात आला आहे.

            मोबदला मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे याप्रमाणे मोबदला स्विकारण्यासाठी भूसंपादन कार्यालयाने पाठविलेल्या नोटीसीची मुळ प्रत. पोलीस पाटील यांच्याकडील दाखला, खातेदार मयत असल्यास मृत्यूचा दाखला, वारसा रजिस्टर उतारा (गाव नमुना नंबर 6 क व 6).  मिळकतीच्या अनुषंगाने कोणत्याही न्यायालयात वाद असल्यास तत्संबंधीत नोटीसा व नुकसान भरपाईची रक्कम यापूर्वी घेतली असल्यास-नसल्यास तशी खात्री करुन, तसेच मिळकतीत वाद नसल्यास तसे विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्र कार्यकारी दंडाधिकारी यांच्यासमोर रुपये १००/-चे बाँड पेपरवर पूर्ण केलेले. मोबदलाधारक मयत असल्यास सर्व वारसांचे एकत्र प्रतिज्ञापत्र. विहित नमुन्यातील क्षतिपूर्ती बंधपत्र  (कार्यकारी दंडाधिकारी यांच्यासमोर रुपये १००/-चे बाँड पेपरवर पूर्ण केलेले) विहित नमुन्यातील स्वघोषणापत्र (साध्या कागदावर). शिधापत्रिकेच्या पहिल्या व नांव नमुद असलेल्या शेवटच्या पानाची प्रत, अधारकार्ड, पॅनकार्ड, बँक पासबूक, Cancelled कोरा चेक, विहित नमुन्यातील फॉर्मवर बँकेकडील शिक्का व स्वाक्षरी तसेच आधारकार्ड सहीत स्वतःचे व साक्षीदार पासपोर्ट साईज फोटो, आधारकार्डला मोबाईल लिंक असणे आवश्यक आहे (OTP साठी) बँक पासबुकचची बँकेकडून प्रमाणित केलेले फोटो असलेली छायांकित प्रत. वर्ग २ बोजा असल्यास त्याप्रमाणे नाहरकत प्रमाणपत्र व नावात/अडनावात बदल असल्यास शासन राजपत्रात केलेल्या बदलाची सर्व मोबदलाधारकांची प्रत जोडणे आवश्यक आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा