You are currently viewing आठव

आठव

*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तथा जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी वि ग सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*आठव*

〰️〰️〰️

तुझ्या आठवांच्या सावलीत

इमले शब्दांचे मीच बांधीतो

 

ब्रह्मांडी , अस्तित्व सारे तुझे

तुझ्याच रुपात मीच पााहतो

 

निळ्यासावळ्या नभांगणात

मी भावप्रीती शोधीत रहातो

 

ते शोधणेच छंद या जीवाचा

श्वासाश्वासासंगे नित्य जपतो

 

जन्म साराच दान दयाघनाचे

निष्पाप क्षणक्षण मी झेलीतो

 

न उरला लोभ आता कशाचा

निर्मोही भाव अंतरात जपतो

 

दाता तारक कृपाळू कृपावंत

लाभले त्यात मी सुख मानतो

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

 

*वि. ग. सातपुते.(भावकवी )*

*📞(9766544908,)*

प्रतिक्रिया व्यक्त करा