You are currently viewing जन्म कवितेचा

जन्म कवितेचा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा अध्यक्ष कोमसाप सावंतवाडी लेखक कवी दीपक पटेकर (दीपी) लिखित अप्रतिम काव्यरचना*

“आनंदकंद वृत्त”

*जन्म कवितेचा*

कोण्या भल्या पहाटे गाली कळी खुलावी
शब्दांतुनीच माझ्या कविताच जन्म घ्यावी
उठता सुहास्य वदने ओठांत गुणगुणावी
प्रत्येक क्षण क्षणाला माझ्या मुखी रुळावी

साक्षात लावणी की, ओवी अभंगवाणी
माझ्या मनी सुचावी, निर्भेळ प्रेम गाणी
भाषा सुलभ सोपी, बोली समाज जाणी
भावार्थ जाणणाऱ्या गालात हास्य आणी

इच्छाच एवढी की, जे भावते स्फुरावे
मी काव्य लिहिले ते तुम्हास आवडावे
ओतून जीव लिहिले ताला सुरात यावे
स्पर्शून तन मनाला व्यापून विश्व जावे

©दीपक पटेकर (दीपी)
सावंतवाडी, सिंधुदुर्ग
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा