You are currently viewing रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेतर्फे दोडामार्ग तहसीलदार राहुल गुरव यांचा सत्कार

रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेतर्फे दोडामार्ग तहसीलदार राहुल गुरव यांचा सत्कार

रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेतर्फे दोडामार्ग तहसीलदार राहुल गुरव यांचा सत्कार

धान्य वितरणातील अडचणींवर तोडगा निघावा – संघटनेची प्रशासनाकडे मागणी

दोडामार्ग :

सरकारमान्य रास्त भाव धान्य दुकानदार संघटना, दोडामार्ग तर्फे नूतन तहसीलदार राहुल गुरव यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी संघटनेचे तालुका अध्यक्ष सतीश मोरजकर यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भेटीदरम्यान संघटनेच्या वतीने दोडामार्ग तालुक्यास कायमस्वरूपी पुरवठा अधिकारी नेमावा, अशी लेखी मागणी तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली. सध्या तालुक्यातील पुरवठा अधिकारी ओरोस येथे बदली झाल्याने प्रभारी पुरवठा अधिकारी कार्यरत आहेत. मात्र दोडामार्गसारख्या ग्रामीण व विस्तीर्ण भागातील ५६ गावांमध्ये सेवा देताना अडचणी निर्माण होत असल्याचे प्रतिनिधींनी सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांकडून वारंवार आदेश देऊनही दोडामार्ग तालुक्यात पुरवठा अधिकारी नियमित हजर राहत नसल्याने, धान्य दुकानदार तसेच नागरिकांना अन्नधान्य वितरण प्रक्रियेत अडथळे येत आहेत. त्यामुळे प्रशासनाने या समस्येची गंभीर दखल घेऊन कायमस्वरूपी पुरवठा अधिकारी नेमावा, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली.

या प्रसंगी अध्यक्ष सतीश मोरजकर, रमाकांत तळकटकर, संजय गवस, नाना नाईक, शिवम गवस, तनुजा भिसे, पुरवठा कर्मचारी श्रीमती ठाकूर, प्रथमेश घाडीगावकर, ऑपरेटर करूणा, श्री. संकपाळ, गोरख तावटे यांच्यासह सर्व धान्य दुकानदार उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा