You are currently viewing तुळस माऊली अंगणातली

तुळस माऊली अंगणातली

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*तुळस माऊली अंगणातली*

 

 

तुळसमाऊली अंगणातली सांगते मजला काय

नावाजून मज नाव दिले हो साऱ्यांनी तुळशी माय…

पावित्र्याचे प्रतिक आहे विष्णुप्रिया मी आहे

तुळशीमाळ हो गळ्यातली ती खूप सांगते काय…

 

गुणी असे मी खूप खूप हो औषध आहे ताजं

रक्षणकर्ती दारामध्ये दिसणं माझं साधं

प्रतिकारक मी रोगाची हो रोज सेवता पाने

त्वचारोगही पळती बरकां चोळता देते दाद..

 

चहात टाका स्वाद कसा तो मनास मोहून घेतो

डौलदार मी अंगणातही सुगंध माझा येतो

वृंदावनी तर रानच माझे म्हणती गोपी येती

अजून चालते रास तिथे हो कृष्णसखा खेळतो..

 

सज्जन म्हणती लोक त्याला गळ्यात तुळशी माळ

पवित्र मानती विष्णुप्रिया तुलसीविवाह काळ

सर्वार्थाने श्रेष्ठ असे ती आपली तुलसी माता

पूजा करावी रोज स्मरावी तिजला सांजसकाळ…

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा