*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*जिथे जावे तिथे*
जिथे जावे तिथे
सारखीच दिसते गोष्ट
आयता हवा पैसा
नकोत काही कष्ट…
जिथे जावे तिथे
पसरलेला भ्रष्टाचार
उरला ना कुठे
पारदर्शी व्यवहार…
हवी बसायला खुर्ची
हवा तो मानमरातब
कर्तव्य टाळती शिताफीने
काढतात कोणतीही सबब…
शाळा नाही सुटल्या
मंदिरही देवाचे नाही
सुटला ना दवाखाना
भ्रष्टाचार सर्वत्र पाही….
जिथे जावे तिथे
भावनेला पडतो तडा
विश्वास ठेऊन रहाणारा
ठरतो जगी वेडा….
जिथे जावे तिथे
उचलावे रस्त्यातील काटे
सोडू नये माणुसकी
कर्तव्य आपले मोठे….
अरुणा दुद्दलवार @✍️

