You are currently viewing शाळेची घंटा

शाळेची घंटा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*शाळेची घंटा*

 

संपवून टाका

मुलांनो तंटा

शाळेची वाजली

घणघण घंटा

 

जागेवर ठेवा

सारा खेळ

आता नाही

मुळीच वेळ

 

मैदानावर

जरा भटकणे

मित्रां सोबत

गप्पा मारणे

 

कोणते तास.

कोणत्या बाई

सारं आठवायची

करा घाई

 

गणवेश जरा

सारखा करा

वह्या, पुस्तके

दप्तरात भरा

 

हसरी, खेळती

जशी फुले

घंटा ऐकताच

धावली मुले

 

गणवेश घालून

खूप बदलतात

घंटेच्या स्वराने

विद्यार्थी बनतात

 

श्रीनिवास गडकरी

रोहा पेण पुणे

9130861304

@सर्व हक्क सुरक्षित

केवळ नावासहितच पुढे पाठवावे

प्रतिक्रिया व्यक्त करा