*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा काव्य निनाद साहित्य मंच पुणे समूहाच्या सन्मा. सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा पिटके लिखित अप्रतिम काव्यरचना*
*माऊलीच्या भेटीसाठी*
माऊलीच्या भेटीसाठी
झाला जीव कासावीस
चैन पडेना मनाला
रात्रंदिन मोजी दिस
-****************१
भेट तुझी माझी माय।
झाली होती आषाढीला
कधी येणार कार्तिकी ?
जीव तुझ्यात गुंतला
*************** २
नको आता अंत पाहू
धाड मज आवतण
दिन रात मनामध्ये
तुझे होतसे स्मरण
************** ३
धाव पाव विठाबाई
येग मला नेण्यासाठी
जीव गुंतला तुझ्यात
नेत्री आसवांची दाटी
—-************* ४
देई दर्शन त्वरित
पसरते माझी झोळी
नम्रपणे विनविते
तुझी एक दासी भोळी
***************५
प्रतिभा पिटके
अमरावती
