कुडाळ : सिंधुदुर्गातील राजकीय समीकरणांना नवे वळण देत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष हेमंत उर्फ काका कुडाळकर यांनी आज शिवसेनेचा भगवा स्वीकारला. त्यांच्या प्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकीय पटावर नव्या चर्चांना ऊत आला आहे.
काका कुडाळकर हे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या राजकीय शाळेत घडलेले कार्यकर्ते मानले जातात. प्रशासकीय अनुभव, संघटन कौशल्य आणि सर्वपक्षीय संपर्क यामुळे त्यांचा दबदबा जिल्ह्यात कायम राहिला आहे. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून यशस्वी कारकीर्द गाजवली असून स्थानिक राजकारणात त्यांची ओळख दमदार नेतृत्व म्हणून आहे.
त्यांच्या या हालचालीमुळे शिवसेनेला सिंधुदुर्गात नवी ऊर्जा मिळेल, तर प्रतिस्पर्ध्यांच्या गणितात चांगलीच खळबळ माजेल, अशी राजकीय वर्तुळातील चर्चा सुरू आहे.
