You are currently viewing मनूस सांगती आम्हा पासून शीक

मनूस सांगती आम्हा पासून शीक

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*मनूस सांगती आम्हा पासून शीक*

 

*ठेका नाही दिला माणसांना*

डोके वापरायचा *प्रत्येक वेळी*

पशूही आहेत *त्याहून सरस*

धावून येतात *आयत्यावेळी*…1

पाहिलात आपण प्रसंग बाका

उध्वस्त झाला असता *चौक*

रवंथ करणारी *ध्यानस्थ म्हैस*

कसा बुडवला टेम्पो *स्फोटक*..2

नसून कुठले विशेष प्रशिक्षण

वापरून आपला सिक्स सेन्स

हाणून पाडला मोठा *विध्वंस*

माणसास ठरवून *नाॅनसेन्स*….3

असून जागा अती *वर्दळीची*

विध्वंस करायला बहू अनुकूल

नव्हते भरले दिवस *पंपाचे*

टेंपोला भिरकावून केला कूल…..4

सजग असतात पाळीव प्राणी

रक्षण करतात *घेऊन रीस्क*

लावून बाजी आपल्या प्राणांची

मनूस सांगती आम्हाकडून शीक…5

 

विनायक जोशी 🖋️ठाणे

मीलनध्वनी/9324324157

प्रतिक्रिया व्यक्त करा