मराठी लाईव्ह न्यूज, महाराष्ट्र राज्य, सहाव्या वर्धापन दिनानिमित्त सन्मान कर्तृत्वाचा २०२५ सन्मानित व्यक्तिमत्त्व
डहाणू :
सौ.अनुपमा रामेश्वर जाधव, उपक्रमशील, आदर्श शिक्षिका, ज्येष्ठ साहित्यिका, कथाकार, सामाजिक कार्यकर्ती पर्यावरण प्रेमी, या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या प्रतिक आहेत.
दि डहाणू एज्यूकेशन ट्रस्ट संचलित शाळा के.एल.पोंदा.हायस्कूल, डहाणू, पालघर येथे त्या शालेय शिक्षण क्षेत्रात आजही योगदान देत आहेत.त्यांचे शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, क्षेत्रात त्या आदर्श शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात.
अनुपमा जाधव यांना आजवर राज्यस्तरीय क्रांतीज्योती प्रेरणा पुरस्कार, खान्देश रत्न पुरस्कार, आदर्श शिक्षिका पुरस्कार, नारीशक्ती पुरस्कार अशा अनेकविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
त्यांचे समुद्रसंगीत , वहिवाट, मराठी कविता संग्रह तर रानझरा हा मराठी व अहिराणी भाषेतील कविता संग्रह, अनुबंध हा कथासंग्रह, प्रकाशित झाले आहेत.त्यांचे आगामी प्रकाशन आत्मकथन वादळवाट,प्रकाशनाच्या मार्गावर आहे.
त्यांनी आकाशवाणी मुंबई, नाशिक, केंद्रावर कथाकथन, काव्यवाचन केले असून पुणे येथे एफ.एम.रेडिओ वर त्यांची मुलाखत, काव्यवाचन, कवितांचा पाऊस, त्यांनी सादरीकरण केले आहे.
पर्यावरण जनजागृती साठी त्यांनी स्वच्छ भारत अभियान, आणि प्लॅस्टिक मुक्त भारत मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. कंपोस्ट खत निर्मिती, परसबाग, वृक्षारोपण, समुद्र किनारे स्वच्छता अभियान,यात सहभाग घेतला आहे.शालेय विद्यार्थ्यांसाठी कविता फुलते कशी, कथाकथन, विद्यार्थ्यांचे कवी संमेलन,असे विविध उपक्रम राबविले आहेत.
प्रेरणादायी प्रवास…
त्यांना बालपणापासून शिक्षण आणि समाज सेवा ही त्यांची आवड होती.भातुकलीच्या खेळातही त्यांनी नेतृत्व घेतले.आणि आज त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक कार्यातून त्यांनी यशाचे प्रत्येक शिखर गाठले आहे.
सौ.जाधव यांना आई, वडील, गुरुजन,व जीवनसाथी यांची प्रेरणा मिळाली आहे.त्यांच्यामुळे योग्य मार्गदर्शन, संस्कार आणि संधी त्यांना प्राप्त झाली आहे.
त्यांच्या गुणांचा समाजाला लाभ… त्यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य, मार्गदर्शन,व संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत.विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांसाठी त्या मार्गदर्शन करतात.यामुळे विद्यार्थ्यांचे यश हेच त्यांचे सर्वोच्च समाधान आहे.
आव्हाने आणि त्यावर मात..
सौ.जाधव यांनी स्वतःचा वेळ,मन, संसाधने वापरुन गरजू विद्यार्थ्यांना मदत केली आहे. अनेक अडचणी असूनही त्यांनी चिकाटीने व प्रामाणिकपणे, समाज कार्यात योगदान दिले आहे.
व्यक्तिगत विचार व प्रेरणा..
परमेश्वराने दिलेला रंग, रुप स्वीकारावे. गुणवंत, बुध्दीमत्ता, मेहनत, जिद्द ,चिकाटी,परीश्रमाने सकारात्मतेचा संदेश दिला आहे.
सतत पुढे जाण्याची प्रेरणा
ज्या प्रमाणे समुद्रातील जहाज वादळाला सांगते की,दूर हो मला किनारा गाठायचा आहे.त्याच प्रमाणे आत्मविश्वासाने संकटांना दूर करुन प्रेरीत करावे.
संदेश… कठिण परिस्थिती आली तरी.पण जिद्द, चिकाटी मेहनतीने वेळेचा सदुपयोग केल्यास यश निश्चित आहे.
आत्महत्या कधीही करु नका.
शिक्षण, आरोग्य, संस्कृती या तीन गोष्टींवर लक्ष ठेवा.
गौरवाचे क्षण..!
सौ.अनुपमा जाधव यांचा सर्वांत आनंदाचा क्षण म्हणजे, विद्यार्थ्यांकडून मिळालेला प्रतिसाद!
विद्यार्थी म्हणतात, मॅडम तुम्ही आम्हाला खूप छान शिकवतात. आम्हाला तुमचं शिकवणं आवडते. तो आनंद अवर्णनीय असतो.
त्यांचा सहभाग स्वच्छ भारत अभियान, पर्यावरण जनजागृती, राष्ट्रीय हरित सेना, साहित्यिक कार्यक्रमाध्ये समाजात निस्वार्थी कार्याचे आदर्श तयार करतो.
सौ.अनुपमा रामेश्वर जाधव.शिक्षण , साहित्य, समाजसेवा आणि पर्यावरण यांचा प्रेरणादायी संगम, सन्मान कर्तृत्वाचा मधील सन्मानिय व्यक्तिमत्त्व.
या कार्यक्रमात प्रशासकीय अधिकारी,शिक्षणतज्ञ, पत्रकार, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
ईश्वर महाजन यांनी केलेला हा मराठी लाईव्ह न्यूजच्या कार्याला हार्दिक शुभेच्छा!
सौ.अनुपमा जाधव यांचे परिसरातून अभिनंदन होत आहे.
