You are currently viewing आ. निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाने रॉकगार्डन वीजपुरवठा पुन्हा सुरू

आ. निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाने रॉकगार्डन वीजपुरवठा पुन्हा सुरू

आ. निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाने रॉकगार्डन वीजपुरवठा पुन्हा सुरू;

दीपक पाटकर यांच्या प्रयत्नांना यश

मालवण

आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रशासनाच्या पाठपुराव्यामुळे रॉकगार्डन परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. वीज मीटर व तारा जळाल्याने काही दिवसांपासून हा भाग अंधारात होता. अखेर आमदार निलेश राणे यांच्या सूचनेनंतर शिवसेना मालवण शहरप्रमुख दीपक पाटकर यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे नवीन वीजजोडणी व मीटर बसविण्यात आले आहेत.

रॉकगार्डन परिसरात पुन्हा एकदा विद्युत रोषणाई झळकू लागल्याने स्थानिक व्यावसायिक व पर्यटक दोघांनीही समाधान व्यक्त केले आहे. दीपक पाटकर यांनी या कामासाठी माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे आभार मानले.

पाटकर म्हणाले, “राणे कुटुंबाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जनतेच्या सेवेसाठी नेहमी तत्पर आहोत. रॉकगार्डन वीजप्रश्न निकाली निघाल्याने पर्यटनाला चालना मिळेल.”

या वेळी शिवसेना पदाधिकारी राजू बिडये, महेश सारंग, आबा शिर्सेकर, रोहन आचरेकर, कमलेश कोचरेकर, संदीप मालंडकर यांसह अन्य पदाधिकारी आणि स्थानिक व्यावसायिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा