You are currently viewing सावंतवाडीचा आयुष पाटणकर राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक विजेता

सावंतवाडीचा आयुष पाटणकर राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक विजेता

सावंतवाडीचा आयुष पाटणकर राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक विजेता

सावंतवाडी:

सावंतवाडीचा तरुण नेमबाज आयुष पाटणकर याने राज्यस्तरीय इंटरस्कूल नेमबाजी स्पर्धेत दैदिप्यमान कामगिरी करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत आयुषने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात १९ वर्षांखालील गटात सुवर्णपदक पटकावून सावंतवाडीसह संपूर्ण जिल्ह्याचा गौरव वाढविला आहे.

राज्यातील निवडक नेमबाजांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. अत्यंत चुरशीच्या वातावरणात झालेल्या लढतीत आयुषने आपल्या अचूक निशाण्याने सर्वांना प्रभावित केले. उत्कृष्ट नेमबाजी सादर करत त्याने सर्वाधिक गुण मिळवून सुवर्णपदकाचा मान पटकावला.

आयुषच्या या नेत्रदीपक यशाबद्दल त्याचे प्रशिक्षक, शाळा व्यवस्थापन, कुटुंबीय तसेच सावंतवाडीतील मान्यवर आणि क्रीडाप्रेमींनी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. या यशामुळे सावंतवाडीतील तरुणांमध्ये नेमबाजी या खेळाविषयी नवचैतन्य निर्माण झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा