*ज्येष्ठ लेखक कवी भूमिपुत्र वाघ लिखित अप्रतिम काव्यरचना*
*स्वप्नसुंदरी*
भुरळ का पडावी मजसी
सरसी का कोणी केली
कोण ती अनामिका
काळजात विसावली
कळलेच ना मला तिलाही
गंध मोगऱ्याचा दरवळला
रास क्रीडेत चांदण्यांच्या
तो राजा चंद्र सुखावला.
स्वप्नातले चांदणे ते
स्वप्निच विरून गेले
अनामिकेचे परतने ते
घाव काळजावर कोरून गेले..
भूमिपुत्र वाघ
