सरपंच पदासाठी अर्ज दाखल न झाल्याने प्रभारी सरपंच म्हणून हेमंत मराठे पाहणार काम
सावंतवाडी
ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे उपसरपंच पदासाठी हेमंत रमाकांत मराठे यांची बिनविरोध निवड झाली आहे. सरपंच पदासाठी एकही अर्ज दाखल न केल्याने सरपंच पद रिक्त राहणार आहे. त्यामुळे उपसरपंच हेमंत मराठे हेच प्रभारी सरपंच म्हणून कारभार पाहणार आहेत. यावेळी ग्रामपंचायत सदस्य मधूकर जाधव, अमोल नाईक, महेश शिरसाट, स्नेहल मुळीक, गिरीजा मुळीक, खुशी कुंभार, सानिका शेवडे, मिलन पार्सेकर, कविता शेगडे ग्रामविकास अधिकारी अनंत गावकर आदी उपस्थित होते. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून के. एच. वळवी हे यांनी काम पाहिले आहे.