You are currently viewing बाहेरगावच्या प्रतिनिधीकडून शहरात धुमशान-धमक्या तरीहि सावंतवाडीकर शांत कारण हा संस्कृतीचा एक भाग-रवी जाधव

बाहेरगावच्या प्रतिनिधीकडून शहरात धुमशान-धमक्या तरीहि सावंतवाडीकर शांत कारण हा संस्कृतीचा एक भाग-रवी जाधव

बाहेरगावच्या प्रतिनिधीकडून शहरात धुमशान-धमक्या तरीहि सावंतवाडीकर शांत कारण हा संस्कृतीचा एक भाग-रवी जाधव

ही लोकशाही आहे आणि येथे आपलं मत मांडण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे.
जसजशा निवडणुका जवळ येत आहेत तसतसे पुढारी जागे होत आहेत. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सुसंस्कृत सावंतवाडीची शांतत भंग करण्याचा प्रयत्न एका प्रतिनिधीकडून सुरू झाला आहे परंतु तो प्रतिनिधी विकासाबाबत एकही शब्द न बोलता विचित्र प्रकारच्या धमक्या व उद्धटपणे काही पण बोलून या शांत व सुसंस्कृत सावंतवाडी शहरात दहशत निर्माण करण्याचा प्रकार सुरू केला आहे.
शहरातील युवावर्ग, ज्येष्ठ नागरिक शालेय विद्यार्थी, उपचार घेत असलेल्या रुग्णांवर तसेच सर्वसामान्य जनतेसाठी हि धोक्याची घंटा मानली जात आहे. एका काळी शांत व संयमी सावंतवाडी शहर अशी या शहराची ओळख होती त्यावेळी शहराबाहेरील व्यक्ती देखील सावंतवाडी शहराला पसंती देऊन जागा खरेदी करून घर बांधून वास्तव करत आहे तसेच रोज बाहेरून पर्यटक देखील या शहरात येत आहेत परंतु हे सध्या चाललेले विचित्र प्रकार पाहून त्यांच्या मनावर काय परिणाम होणार याचा विचार येथील प्रतिनिधींनी नक्कीच करावा. शहरातील जनता अशा या वातावरणाला फार कंटाळून गेलेली आहे याला जबाबदार कोण.
स्थानिक आमदारांचा ज्यावेळी या सुसंस्कृत शहरावर लक्ष होता त्यावेळी अशा घटना एवढ्या मोठ्या प्रमाणात घडत नव्हत्या पण आज बाहेर गावावरून या शहरात आलेला लोकप्रतिनिधी आमच्या या सुसंस्कृत शहरामध्ये धुमशान करत आहे आणि सावंतवाडीची जनता ते निमुटपणे सहन करून शांत आहे याचे कारण तो आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे म्हणून, पण या गोष्टीचा कोणी गैरफायदा घेऊ नये कारण ही उपरलकर पाटेकराची पवित्र भूमी आहे आणि येथे अतिशयोक्ती मुळीच चालत नाही एवढेच लक्षात ठेवावं.
काही वर्षांपूर्वी तुंम्ही सर्वजण एकत्र गुण्या गोविंदाने नांदत होतात.
या शहराचा काहीतरी विकास कराल म्हणून आपल्याला सावंतवाडीकरांनी संधी दिली त्याचा आपल्याला फायदा करून घेता आला नाही उलट नगरपरिषदेची तिजोरी खाली झाली तर गोरगरीब व्यापाऱ्यांचे धंदे उध्वस्त करून गोरगरीब व्यापाऱ्यांना रस्त्यावर आणलं हे अजून कोणी विसरला नाही एवढं लक्षात ठेवा. आपण आता कितीही उधळ आपट केली तरी यापुढे सावंतवाडीकर विषयाची परीक्षा घेणार नाही हे पण ध्यानात ठेवा सांगायचा विषय एवढाच की,
जे काय आपले वाद असतील ते आपण परस्पर मिटवा भविष्यात आपण सर्वच पुन्हा एकत्र याल हे निश्चितच आणि खात्री देखील आहे कारण ते शेवटी राजकारण आहे त्याबद्दल जरा सुद्धा वाद नाही.
परंतु सावंतवाडीच्या जनतेला या पुढे नाहक त्रास नको ज्या काय आपल्या येऊ घातलेल्या निवडणुका आहेत त्या निवडणुका जनतेला त्रास होणार नाही याची काळजी घेऊन तुम्ही शांतपणे लढवाव्यात अशी नम्र विनंती आम्ही सावंतवाडीचे नागरिक म्हणून आपल्याला करत आहोत.

प्रतिक्रिया व्यक्त करा