You are currently viewing चांदेल-गोवा येथे विलवडेतील तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू…

चांदेल-गोवा येथे विलवडेतील तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू…

चांदेल-गोवा येथे विलवडेतील तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू…

भाऊबीज करून परतताना दुर्दैवी प्रकार…

बांदा

गोव्यात बहिणीकडे भाऊबीजेची ओवाळणी करून परतताना विलवडे येथील वीस वर्षीय युवकाचा दुचाकी अपघातात दुर्दैव मृत्यू झाला. ऋषिकेश बापूजी दळवी (वय २०, रा. विलवडे-फौजदारवाडी) असे तरुणाचे नाव आहे. हा अपघात आज सायंकाळी उशिरा बांदा हसापूर मार्गावर चांदेल गोवा येथे घडला.

ऋषिकेश हा गोव्यातील आपल्या बहिणीकडे आज दुपारी भाऊबीजेला गेला होता. बहिणीने भाऊबीजेची केलेली ओवाळणी ही त्याच्यासाठी शेवटची भाऊबीज ठरली. सायंकाळी उशिरा तो घरी विलवडे ते परतत असताना मुसळधार पावसात रस्त्याचा अंदाज न आल्याने झाडाला दुचाकी धडकून त्याचा जागीच मृत्यू झाला. ऋषिकेश याने बारावीपर्यंतचे शिक्षण बांदा खेमराज महाविद्यालयात पूर्ण केले होते. सध्या तो सावंतवाडी येथील भोसले नॉलेज सिटीत इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता. त्याच्या अपघाती मृत्यूने विलवडे गावात शोककळा पसरली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा