*सुप्रसिद्ध अभिनेते सतिश शाह यांचं निधन, वयाच्या ७४ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप*
मुंबई :
‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ फेम अभिनेते सतिश शाह यांचं वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झालं आहे. भारतीय चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक अशोक पंडित यांनी या बातमीला दुजोरा देत म्हटलं आहे की, ते आता या जगात नाहीत. किडनी फेल झाल्यामुळे त्यांना दुपारी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयातच अभिनेत्यानं जगाचा निरोप घेतला.
या बातमीनं संपूर्ण इंडस्ट्रीला धक्का बसला असून चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकार शोक व्यक्त करत आहेत. हरहुन्नरी अभिनेते असलेले सतिश शाह यांचं काही तासांपूर्वी किडनी फेल्युअरमुळे निधन झालं. त्यांना हिंदुजा रुग्णालयात नेण्यात आलं, तिथं त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हिंदी फिल्म इंडस्ट्रीसाठी हे मोठं नुकसान आहे.

