*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*दिवाळी*
ती आली अन् गेली
तशी ती नेहमीच
येते अन् जाते
दरवर्षी
तिच्या जाण्यापासून
पुढच्या वर्षी येण्यापर्यंत
तिची ओढ कायम असते
कारण ती येतेच
काहीतरी घेऊन
आणि जाते
काहीतरी देऊन
तिचे येणे म्हणजे
आयुष्याला उजाळा असतो
तिच्या येण्याचा थाटच
निराळा असतो
भारत वर्षात
ती येते आनंद उत्साह घेऊन
ती येते दिप घेऊन
त्या दिव्या सोबत
प्रकाश तेज दिव्यत्व
अंधाराला शमविण्याची
ताकद घेऊन
ती येते गुलाबी थंडी घेऊन
ती येते करवा चौथ पासून
कर अष्टमी बसूबारस
धनत्रयोदशी नरक चतुर्दशी
दिपावली पाडवा बली प्रतिपदा
भाऊबीज घेऊन
ती येते अभ्यंग स्नान घेऊन
नवचैतन्य घेऊन
नव्याची खरेदी घेऊन
नवे रंग नवे वस्त्र
नव्या वस्तू नवा झगमगाट
नवी आतषबाजी
वर्षभराच्या भेटीगाठी
स्नेह प्रेम उल्हास
आनंद उत्सव
प्रवास प्रफुल्लता
आणि दिवाळी फराळ
ती आली म्हणजे
बाजाराला उधाण येते
फिरायला मस्ती येते
ती येते
काहीनाकाही देऊन जाते
ती प्रत्येकाच्याच आनंदात
सहभागी होते
खरे तर ती
देण्यासाठीच येत असते
घराघराला तिचा सहवास लाभतो
तरीही कोणीतरी म्हणतो
दिवाळी आली
अन् दिवाळं काढून गेली
अहो ती तर
दिप घेऊन येते
तुमचे घर प्रकाशमान
करूनच जाते
म्हणूनच तुम्ही तिची
आतुरतेने वाट पाहत असतात
यंदाची दिवाळी
आनंदात साजरी करू म्हणून……
कवी :-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर, धुळे.*
7588318543.
8208667477.
