You are currently viewing आरती मासिक आयोजित कथा व कविता लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर

आरती मासिक आयोजित कथा व कविता लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर

*डॉ.नितीन बळवली यांची ‘पुनर्भेट’ कथा व गोपाळ कबनूरकर यांच्या ‘माझी माय’ कवितेला प्रथम क्रमांकाचा सन्मान*

 

सावंतवाडी (प्रतिनिधी):

ज्येष्ठ साहित्यिक अरुण सावळेकर (पुणे) पुरस्कृत आणि आरती मासिक आयोजित राज्यस्तरीय कथा व कविता लेखन स्पर्धा २०२५ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. कथालेखन स्पर्धेत नवी वाशी येथील डॉ नितीन बळवली यांच्या ‘पुनर्भेट’ या कथेने प्रथम क्रमांक पटकाविला. तर कविता लेखन स्पर्धेत मिरज येथील गोपाळ कबनूरकर यांच्या ‘माझी माय’ या कवितेने प्रथम क्रमांक पटकाविला.

कथालेखन स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे प्रथम – पुनर्भेट – डॉ नितीन बळवली (नवी वाशी), द्वितीय – करिष्मा पंढरपुरी – उज्वला लुकतुके (डोंबिवली ), तृतीय झाले मोकळे आकाश – रविंद्र नारायण पुणेकर (पुणे), उत्तेजनार्थ हनुमंत कृष्णा महाबळ (सिंधुदुर्ग), सुधाकर भगवान कांबळे (कल्याण), सौ रुपाली भालचंद्र सुपेकर (रत्नागिरी ), रामकृष्ण भगवंत अघोर (सोलापूर).

कविता लेखन स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे प्रथम – काव्य लेखन प्रथम – माझी माय – गोपाळ कबनूरकर (मिरज ), द्वितीय संयुक्त – सलाम – सौ. चारुता शरद काळे (पुणे) आणि अडगळ – कल्पना मलये (सिंधुदुर्ग ), तृतीय संयुक्त – पावसाचा भांग भर – उज्वला लुकतुके (मुंबई), वधले गांधी – बाबुराव श्रीपाद कांबळे (कोल्हापूर ), लाईकचे गुलाम – दत्ताराम गणपत इंगळे (सोलापूर), उत्तेजनार्थ मीनाक्षी अळवणी (सिंधुदुर्ग), रवींद्र पुणेकर (पुणे), जयराम मुसळे (पुणे).

या राज्यस्तरीय स्पर्धेतील कथांचे परीक्षण डॉ जी ए बुवा, प्रभाकर भागवत, शंकर प्रभू यांनी तर कवितांचे परीक्षण कवयित्री उषा परब श्वेतल परब यांनी केले. यावर्षी राज्यभरातून ३८ कथा स्पर्धकांनी व ३७ कविता स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण लवकरच कऱण्यात येणार असुन विजेत्या स्पर्धकांना साहित्य क्षेत्रातील मान्यवरांच्याहस्ते रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. विजेत्या स्पर्धकांचे अध्यक्ष डॉ. जी. ए. बुवा, प्रभाकर भागवत, उषा परब, संपादक भरत गावडे, सचिव सुरेश मुकणावर, सहाय्यक सचिव विठ्ठल कदम यांनी अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा