You are currently viewing विद्या विहार इंग्लिश स्कूल आरोसचा इयत्ता ५ वी व ८ वीचा शतप्रतिशत निकाल

विद्या विहार इंग्लिश स्कूल आरोसचा इयत्ता ५ वी व ८ वीचा शतप्रतिशत निकाल

विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा ठसा

सावंतवाडी:

आरोस शिक्षण प्रसारक मंडळ आरोस संचलित विद्या विहार इंग्लिश स्कूल आरोस विद्यालयाचे इयत्ता ५वी चे ५ तर इयत्ता ८ वी चे २३ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन प्रशालेचा निकाल १००% लागला. इयत्ता ५ वी ला गणित विषयाचे मार्गदर्शन श्री. राजेश पाटकर तर इयत्ता आठवी साठी गणित विषयाचे मार्गदर्शन श्री. मोहन पालेकर सर यांनी केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन अध्यक्ष नीलेश परब, उपाध्यक्ष महादेव पांगम सचिव शांताराम गावडे, स्कूल सहसचिव सिद्धेश नाईक, खजिनदार बाळा मोरजकर, कमिटी अध्यक्ष हेमंत कामत, मुख्याध्यापक धूपकर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा