You are currently viewing साईबाबा सोशल क्लबतर्फे गरजूंना मिठाई, भेटवस्तूंचे वाटप

साईबाबा सोशल क्लबतर्फे गरजूंना मिठाई, भेटवस्तूंचे वाटप

दीपावलीनिमित्त साईबाबा सोशल क्लबचा सामाजिक उपक्रम

 

कणकवली :

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नेहमीच सामाजिक बांधिलकीतून काम करणाऱ्या साईबाबा सोशल क्लब, सिंधुदुर्ग या सामाजिक संस्थेकडून दीपावलीनिमित्त दानशूर व्यक्तीकडून निधी गोळा करून गरजूंना मिठाई व भेटवस्तू वाटप करण्यात आले.

या कार्यात साईबाबा सोशल क्लबचे अध्यक्ष मिंगेल मंतेरो यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या सोबत संतोष राणे, जयवंत बाईत, सुधीर साटम, निलेश गावडे, महेश परब, सुजित बाईत, महेश घाडीगावकर, संदीप पाताडे, राहुल धमानी यांनी विविध मेहनत घेऊन हा उपक्रम राबवला. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा