*ज्येष्ठ लेखिका कवयित्री चित्रकारा आदर्श शिक्षिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*भाऊबीज*
दरवर्षी येई दिवाळीचा सण
माहेरच्या आठवात रमे मन,
आईबाबा आणि भाऊबहीण
भाऊबीजेला दाराकडे लोचन.
🌷
कधी येई भाऊराया,
तया कधी ओवाळिन ,
होते जसे राम लक्ष्मण
तसेच माझे भाऊ दोन.
🌷🌷
बहिणींची वेडी माया
दोन्ही भाऊ गुणवान,
भावांची त्यावरी छाया
बहिणींना मिळे वरदान .
🌷🌷🌷
अशा सुसंस्कारी सुशिक्षित
वारसा चाले घराण्याचा,
आईवडिलांची शिकवण
सन्माने जपती ठेवा त्याचा.
🌷🌷🌷🌷
सर्व बहिणींना आधार
कोणत्याही वेळी गरजेला,
धाऊन येती सत्वर, असे
असावे भाऊ बहिणीला.
🌷🌷🌷🌷🌷
कितीतरी महागड्या देती
भेटी, तरी मायेची पाखर,
आईबाबा नंतरही माहेर
हाच भाऊबीजेचा आहेर.
🌷🌷🌷🌷🌷🌷
स्वप्नगंधा सतीश आंबेतकर
विरार

