*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*गुलाबस्तवन…!!*
सुखसाजण मूळमाया श्रीरंगाची
रांगणा-या वासल्याचा..नाद
वाट..पाहतो तुझ्या उमलण्याची
स्थान तुझे ..माझ्या 💔 ह्दयांत
उषेचा प्रहर येताच
आशिर्वाद अंगणात धाडतोस
कर्माच्या माझ्या खतावणींना
निसर्गदवा पाठीमागे उभा राहतोस
ईश्वरी रूपात…बहरलेलं
रंगलावण्य पाकळ्यांत सुखावत
लहरतोस वारियात दिमाखात
मातीशी माझ्या ..जोडलसं नात
सूर्य ☀ देव केशरी होताच
धरती तुझ्या सौंदर्यावर भाळली
सृषीरूपी ईश्वर जागा झाला
देवा.. आभाळात पुष्पशेज सजली
महासुख… पदरी पडताचं
आत्मप्रभेत आत्मलीन सुखांत
ईश्वरा हळुवार.. ने ..मला
तुझ्या पवित्र..गाभा-यात..
बाबा ठाकूर
