*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*दीपोत्सव*
लोपला अंधार सारा
लक्ष दिप उजळले
नील अंबरात लाख
तारे टीम टीमले
काय महिमा वर्णू त्याचा
सण हा दीपोत्सवाचा
रोषणाई उजळली
लोप झाला काळोखाचा
चंदन उटी लावुनी
अभ्यंग स्नान सुगंधी
आतिषबाजी निलांबरी
फटाक्यांची चढे धुंदी
भिडला गगनावरी
आकाशकंदील टांगला
पणती रांगा अंगणात
दिपोत्सव रंगला
जमती सारे आप्तेष्ट
नाती गोती होती गोळा
संस्काराचा, संस्कृतीचा
सणाचा होतो सोहळा
*शीला पाटील. चांदवड.*
