You are currently viewing तळकट येथे ‘अष्टविनायक मित्रमंडळ’ आणि ‘सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान’च्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न!

तळकट येथे ‘अष्टविनायक मित्रमंडळ’ आणि ‘सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान’च्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न!

तळकट येथे ‘अष्टविनायक मित्रमंडळ’ आणि ‘सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान’च्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न!

दोडामार्ग:

दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर, २१ ऑक्टोबर २०२५ रोजी तळकट प्राथमिक आरोग्य केंद्र येथे अष्टविनायक मित्रमंडळ तळकट कट्टा, तळकट ग्रामपंचायत आणि सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान (शाखा-दोडामार्ग) यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला, अशी माहिती सरपंच श्री सुरेंद्र सावंत यांनी दिली.

शिबिराचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. एकनाथ नाडकर्णी यांच्या हस्ते झाले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी श्रीमती डॉ. अंधारे, डॉ राणे, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री प्रकाश तेंडुलकर, सरपंच श्री सुरेंद्र सावंत, उपसरपंच श्री रमाकांत गवस, उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडीचे डॉ बाळासाहेब नाईक आणि कर्मचारी वर्ग, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान दोडामार्गचे अध्यक्ष श्री भुषण सावंत, निवृत्त मुख्याध्यापक दुर्गाराम गवस, ग्रामपंचायत सदस्य शशिकांत राऊळ, विवेक मळीक तसेच बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

रक्तदान आणि आरोग्य तपासणी

या शिबिरामध्ये श्री प्रकाश तेंडुलकर आणि डॉ बाळासाहेब नाईक यांनी रक्तदानाचे महत्त्व आणि फायदे याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. रक्तदान शिबिरासोबतच रक्तगट आणि हिमोग्लोबिन तपासणी देखील करण्यात आली. एकूण ४५ जण रक्तदान करण्यासाठी इच्छुक होते. मात्र, त्यापैकी महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्याने आणि काही तांत्रिक अडचणींमुळे केवळ २५ रक्तदात्यानी यशस्वीरित्या रक्तदान केले.

नवीन रक्तदात्यांचा मोठा सहभाग

या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे नवीन रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या २५ रक्तदात्यांमध्ये विठ्ठल आनंद गवस (११ वेळा), निलेश वसंत धुरी (९ वेळा), गोविंद नारायण देसाई (८ वेळा), गोविंद वामन गवस (७ वेळा), सगुण शंकर नाटेकर (६ वेळा), सुरेंद्र संभाजी सावंत भोसले (६ वेळा) यांसारख्या नियमित रक्तदात्यांसोबतच अवधूत नारायण वेटे, विकास विलास सावंत, नारायण चंद्रकांत राऊळ, अरुण अभ्यंकर, मानस मणिपाल राऊळ, राहुल रामचंद्र देसाई, मिलिंद लाडोबा नांगरे, सुमित प्रभाकर मळीक, दशरध सोनू शिंदे, दीपेश दिलीप राऊळ, दत्तप्रसाद दिलीप राऊळ आणि धनश्री शशिकांत राऊळ या नवीन रक्तदात्यांनी (पाहिल्यांदा) रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य

शिबिराच्या यशस्वीतेसाठी श्री एम डी धुरी, विजयकुमार मराठे, विठ्ठल (बाबा) देसाई, दत्ता जोशी, एकनाथ गवस, सुरेश काळे, अमोघ सिद्धे, सिद्धेश देसाई, भिकाजी जोशी यांसह अनेक ग्रामस्थ आणि ज्येष्ठ नागरिकांनी आवर्जून भेट देऊन सहकार्य केले. आरोग्य कर्मचारी आशा संजना नांगरे, अंगणवाडी शिक्षिका दिव्या देसाई आणि आरोग्य कर्मचारी प्रणाली प्रभाकर देसाई यांनीही योगदान दिले.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच सुरेंद्र सावंत, गोविंद (ताता) देसाई, मनोहर सावंत, दत्तप्रसाद सावंत, रमेश शिंदे, प्रज्योत देसाई, संदीप वेटे, बाळू राणे, रामचंद्र (पप्पू) नाईक, सगुण (बबलू) नाटेकर, शिवप्रसाद नाटेकर, गौरेश गवस, राघोबा देसाई, शशिकांत राऊळ, विवेक मळीक, चंद्रहास राऊळ, बाबल गवस आणि तळकट कट्टा येथील युवा वर्गाने विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक श्री रमेश शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री गोविंद गवस यांनी केले. ग्रामस्थांच्या या महत्त्वपूर्ण प्रतिसादाबद्दल संयोजकांनी कृतज्ञता व्यक्त केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा