You are currently viewing माड्याची वाडीतील हल्लाग्रस्त सिद्धेश गावडे यांची शिवसेना जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर यांनी घेतली भेट

माड्याची वाडीतील हल्लाग्रस्त सिद्धेश गावडे यांची शिवसेना जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर यांनी घेतली भेट

हल्ल्याची विचारपूस करून कुटुंबाला दिला धीर; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

कुडाळ :

शिवसेना ओबीसी व्हीजेएनटी महिला जिल्हा प्रमुख वर्षा कुडाळकर यांनी माड्याची वाडी (रायवाडी) येथे झालेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या सिद्धेश प्रमोद गावडे यांच्या घरी भेट देऊन त्यांची विचारपूस केली. तसेच त्यांना धीर दिला.

यावेळी तालुकाप्रमुख अनघा रांगणेंकर, तेंडोळी विभाग प्रमुख माजी सरपंच सचिन गावडे उपस्थित होते. सिद्धेश गावडे यांचे वडील प्रमोद गावडे, आई, बहीण, भावोजीही या भेटीत उपस्थित होते. त्यांनी झालेल्या हल्ल्याबाबत वर्षा कुडाळकर यांना सविस्तर माहिती दिली.

“योग्य तपास करून दोषींवर कठोर कारवाई होईल,” असा विश्वास व्यक्त करत वर्षाताईंनी गावडे कुटुंबाला धीर दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा