*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*🪔दिवाळी हायकू🪔*
दारी अंगणी
सजल्या रंगावली
आनंद मनी….🪔
येता पाहुणे
उत्साहात स्वागत
नाही ना उणे….🪔
अभ्यंगस्नान
असे आरोग्यपूर्ण
तेजस्वी वर्ण….🪔
कपडे नवे
घ्यायचे सर्वांसाठी
हौसच मोठी…🪔
खमंग करू
फराळ व भोजन
तृप्त ते मन….🪔
सांजसमयी
उजळू या पणत्या
प्रकाशदात्या….🪔
लक्ष्मीपूजन
संपन्न ऐश्वर्याचे
तेजोत्सवाचे….🪔
गाईगुरांचा
पाडवा आनंदाचा
कृषीवलांचा…🪔
लेकी माहेरी
भाऊबीज प्रेमाने
होते साजरी….🪔
सुखात जाणू
देणं गरजूंसाठी
भावना मोठी…🪔
अंतःकरण
अंतर्बाह्य उजळो
प्रकाश कळो….🪔
🪔🌷🌷🪔
*अरुणा दुद्दलवार@✍️*

