You are currently viewing आली दिवाळी

आली दिवाळी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री उज्ज्वला सहस्रबुद्धे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*आली दिवाळी…*

 

आली दिवाळी,आली दिवाळी,

घेऊन दिवस आनंदाचे!

रोषणाई करूनी सर्वत्र,

स्वागत करूया दीपावलीचे!

 

दिव्यांच्या माळा, आकाशकंदील ,

अंगणात रेखुया रांगोळी!

रंग भरु या त्यात सुंदर,

लावू या पणत्यांच्या ओळी!

 

पहिला दिवस अभंग स्नान,

सुगंधी तेल, उटणे लावू या!

निरांजनाच्या ज्योती उजळुनी,

आनंदाची दिवाळी करूया!

 

उद्या येईल लक्ष्मीपूजन,

असतो लक्ष्मीचा थाट !

बाजारपेठा उजळती दिव्याने,

दाखवी लक्ष्मीचा लखलखाट!

 

सण पाडवा दाखवी प्रेम,

कुटुंबात पती पत्नीचे!

लक्ष्मीनारायण नांदो सर्वदा,

हेच मागणे असे सर्वांचे !

 

भाऊ बिजेचा चौथा दिवस,

बहिण भावाच्या प्रेमाचा!

डोळ्यांची निरांजने ओवाळी,

भावासाठी आनंद तिचा!

 

येई दिवाळी चार दिवसांची,

आनंद देई वर्षभराचा !

घरोघरी नांदो सौख्य संपदा,

हाच संदेश दिवाळीचा!

 

उज्वला सहस्रबुध्दे, पुणे.

🪔🪔🪔🪔🪔

प्रतिक्रिया व्यक्त करा