*गणित संबोध परीक्षेत सिंधुदुर्ग विद्या निकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल चे सुयश
वेंगुर्ले
सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळामार्फत सप्टेंबर 2025 मध्ये गणित संबोध परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे .या परीक्षेमध्ये सिंधुदुर्ग विद्या निकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, वेंगुर्ला या शाळेने 100 टक्के यश प्राप्त केले आहे.या शाळेतून इयत्ता पाचवी मधून 12 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी 11 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी तर एका विद्यार्थ्याने द्वितीय श्रेणी प्राप्त केली. तसेच इयत्ता आठवी मधून दुर्वांक रामचंद्र मालवणकर व अथर्व उत्तम तोडकर हे दोन विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. या दोन्ही विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 98 गुण मिळवून वेंगुर्ले तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळविला.
गणित संबोध परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष श्री.इर्शाद शेख, संचालक श्री. प्रशांत नेरुकर,सचिव श्री. दत्तात्रय परुळेकर,मुख्याध्यापिका सौ.मनिषा डिसोजा तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

