You are currently viewing वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने साहित्य प्रेरणा कट्टा आजगाव व र. ग. खटखटे ग्रंथालय शिरोडाच्या संयुक्त सहयोगाने पार पडली साहित्य चर्चा

वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने साहित्य प्रेरणा कट्टा आजगाव व र. ग. खटखटे ग्रंथालय शिरोडाच्या संयुक्त सहयोगाने पार पडली साहित्य चर्चा

आजगाव:

जागतिक वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून शिरोडा येथील र.ग.खटखटे ग्रंथालयाच्या सहयोगाने शुक्रवार दि. १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच (५.३०) वाजता खटखटे ग्रंथालयात साहित्य चर्चेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात तत्त्वनिष्ठेची जपणूक (ले. सोमनाथ चटर्जी), एक भाकर तीन चुली (ले.देवा झिंजाड), बाकीबाब (बा.भ.बोरकर विशेषांक) या पुस्तकांवर खुली चर्चा करण्यात आली. यावेळी साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे समन्वयक विनय सौदागर, खटखटे ग्रंथालयाचे कार्यवाह सचिन गावडे आदी उपस्थित होते.

या चर्चासत्रात साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे सदस्य तथा र.ग.खटखटे ग्रंथालयाचे कर्मचारी सहभागी झाले होते. साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे समन्वयक विनय सौदागर नेहमीच विविध साहित्यिक कार्यक्रम राबवित असतात. दर महिन्याला त्यांचा मासिक कार्यक्रम ठरलेलाच असतो. याला र.ग.खटखटे ग्रंथालयाचे सचिव सचिन गावडे यांची मोलाची साथ लाभते आणि साहित्य रसिकांची देखील उपस्थिती असते. यावेळी साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे सोमा गावडे, सरोज रेडकर, ग्रंथालयाच्या ग्रंथपाल यांच्यासह साहित्य प्रेमी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा