You are currently viewing नेरूर पंचक्रोशीत “कलेचा देव कलेश्वर” भव्य नरकासुर व बैल सजावट स्पर्धा २०२५ — उत्साहात होणार आयोजन!

नेरूर पंचक्रोशीत “कलेचा देव कलेश्वर” भव्य नरकासुर व बैल सजावट स्पर्धा २०२५ — उत्साहात होणार आयोजन!

नेरूर पंचक्रोशीत “कलेचा देव कलेश्वर” भव्य नरकासुर व बैल सजावट स्पर्धा २०२५ — उत्साहात होणार आयोजन!

कुडाळ

नेरूर पंचक्रोशीतील रणझुंजार मित्र मंडळ व उद्योजक श्री. रुपेश पावसकर यांच्या संयुक्त विद्यमाने “कलेचा देव कलेश्वर” भव्य नरकासुर स्पर्धा २०२५ व भव्य बैल सजावट स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत. या स्पर्धा नेरूर पंचक्रोशीत प्रथमच भव्य स्वरूपात साजऱ्या होणार असून, नागरिकांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे.

नरकासुर स्पर्धा – रविवार, १९ ऑक्टोबर २०२५
या दिवशी पारंपरिक पौराणिक कथानकावर आधारित नरकासुर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ₹१२,००० रोख व आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक ₹७,००० व तृतीय पारितोषिक ₹४,००० व आकर्षक चषक अशी बक्षीस रक्कम ठेवण्यात आली आहे. याशिवाय, इतर सहभागी संघांसाठी ₹१,००० रोख उत्तेजनार्थ पारितोषिक दिले जाणार आहे.

स्पर्धेची नियमावली पुढीलप्रमाणे आहे: १) नरकासुर स्पर्धेच्या ठिकाणी वेळेपूर्वी उपस्थित राहणे बंधनकारक; उशीर झाल्यास १० गुण कमी केले जातील.
२) सादरीकरणात नरकासुराचा वध आवश्यक आहे.
३) सादरीकरणाची वेळ १० मिनिटे असेल.
४) ही स्पर्धा केवळ नेरूर पंचक्रोशीपुरती मर्यादित आहे.
५) परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

गुणांकनाचे निकष:

नरकासुर प्रतिमा – २० गुण

वेशभूषा/रंगसंगती – १० गुण

चल चित्र – १० गुण

नाविन्यपूर्णता – १० गुण

सादरीकरण/नरकासुर वध – ३० गुण

वेळेवर उपस्थिती – १० गुण

विषय/प्रश्नोत्तर – १० गुण
(एकूण १०० गुण)

बैल सजावट स्पर्धा – बुधवार, २२ ऑक्टोबर २०२५
या दिवशी कलेश्वर मंदिर नेरूर ते नेरूर चव्हाटा दरम्यान भव्य बैल सजावट रॅली आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत श्री.प्रकाश साऊळ, श्री.आजीम मुजावर, श्री.भाई नारिंग्रेकर, श्री.विशाल नाईक, श्री.बाळा रेवंडकर, श्री.आनंद लिंगे, श्री.अवि शिरसाट, श्री.स्वप्निल नेरुरकर, श्री.बाळा नांदोसकर, श्री.बाबी साऊळ व इतर बैल मालक सहभागी होणार आहेत.

रणझुंजार मित्र मंडळ व श्री. रुपेश पावसकर यांनी नेरूर पंचक्रोशीतील सर्व युवक व नागरिकांना या भव्य कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
या आयोजनामुळे पारंपरिक लोककला, ग्रामीण संस्कृती आणि सामाजिक एकोपा जपला जाणार असून, स्थानिक स्तरावर एक वेगळाच सांस्कृतिक उत्सव अनुभवायला मिळणार आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा