पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्यास शासनाची मान्यता
सिंधुदुर्गनगरी
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे विविध विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्याकरिता शासनाने अत्यावश्यकता प्रमाणपत्र मिळाले असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.अनंत डवंगे यांनी दिली आहे.
शासनाकडून सन 2020 मध्ये हे महाविद्यालय सुरु करण्याकरिता मान्यता मिळाली महाविद्यालयातील एमबीबीएस 2021 ची प्रथम बॅच ही लवकरच अंतिम वर्षाची परिक्षा देणार आहे. माहे जून 2025 मध्ये वैद्यकीय शिक्षण व संशोधन, विभागाचे संचालक, डॉ. अजय चंदनवाले व सहसंचालक डॉ.पल्लवी सापळे यांनी संस्थेच्या भेटीदरम्यान महाविदयालयातील विविध विषयामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्याबाबत सूचना दिल्या होत्या, त्यानुसार महाविदयालय प्रशासनाकडून पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्याकरिता शासनास प्रस्ताव पाठविण्यात आला होता, त्यास शासनाची मान्यता मिळाली असून महाविदयालयात विविध विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु होणार आहे. असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी प्रसिध्दी प्रत्रकाव्दारे कळविले आहे.

